
नाना पटोले: श्रेय घेतलं तर हिशेबही द्या
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. मीडियाला, सोशल मीडियाला आणि विरोधकांना धमकावल्याचा आरोप करत त्यांनी याचा निषेध केला. 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे श्रेय सरकार घेत असेल, तर त्यावरील खर्च आणि पहिल्याच पावसात समोर आलेल्या समस्यांबाबत उत्तर देण्याची जबाबदारीही सरकारची असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी त्यांनी लोकशाही, माध्यमांची भूमिका, सरकारची जबाबदारी, राम मंदिर ट्रस्टवरील आरोप, भाजपच्या कारभारावर टीका, मुस्लीम समाजाविषयीची भूमिका, महाडमधील प्रकरण, न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत तसेच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि पुरस्कारांबाबतही विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
