
नाना पटोले यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप! "शेतकरी, अल्पसंख्याक असुरक्षित"
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इथेनॉल धोरणावर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याचा आरोप केला.तसेच राज्यातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, धर्म स्वातंत्र्य कायद्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.अशोक खरात प्रकरण, भोंदू बाबा आणि अजित पवार यांच्या कथित अपघातावरही त्यांनी गंभीर आरोप करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.