Pankaja Munde Bhai Dooj

Share this Video

पुणे ग्रामीण भागात मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड आणि मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज साजरी केली. कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आधीच ठरवले होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी गावाकडच्या पद्धतीने वांगी-बटाट्याची भाजी तयार करण्यात आली असून कामगारांसोबत जेवण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना जनावरांसाठी चारा, पाणी आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Related Video