कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी

Share this Video

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 100 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 ऑगस्ट रोजी कुत्रा चावल्याच्या एकूण 48 घटना नोंदवल्या गेल्या. मात्र, रजिस्टरमध्ये केवळ 4 प्रकरणांची नोंद असल्याने उर्वरित रुग्णांनी खासगी ठिकाणी उपचार घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.चिकन गोडरेज हिल, आधारवाडी, रेतीबंदर आणि कल्याण पश्चिम परिसरातील नागरिकांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमा झालेल्या रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांचा समावेश असून, त्यांना बालरोग शल्यचिकित्सकांकडे पाठवण्यात आले आहे. काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी सायन येथेही पाठवण्यात आले आहे.दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Related Video