Nitin Gadkari

Share this Video

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बस सुरक्षेसाठी नवीन बस बॉडी कोड लागू केल्याचे सांगितले. टेस्टिंग एजन्सीकडून टाइप अप्रूव्हल, फिजिकल आणि व्हिडिओ तपासणीशिवाय बसची नोंदणी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चुकीच्या बसला मंजुरी दिल्यास संबंधित RTO अधिकाऱ्याची नोकरी जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच RTOच्या 17 सेवा डिजिटल करण्याची सूचना केली. शहरातील बस दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल करण्यासाठी लो-फ्लोअर बस, हायड्रॉलिक नीलिंग सिस्टम, व्हीलचेअर लिफ्ट, रॅम्प आणि सपोर्ट हँडल्सची तरतूद केल्याचे गडकरी यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील ड्रायव्हिंग ट्रेनिंग, स्क्रॅपिंग आणि टेस्टिंग सेंटर वाढवण्यासह कॅब अ‍ॅग्रीगेटरच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यावरही त्यांनी भर दिला

Related Video