
Nitesh Rane: सिंधुदुर्गात भातपिकांची पाहणी
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मालगावमध्ये भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्गातील आठही तालुके ट्रिगर वनमध्ये आल्याचे सांगत भाताची वाढ खुंटली असून विहिरींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मेही पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणे, ट्रिगर वनमधील सर्व सवलतींची अंमलबजावणी करणे आणि पाणी साठवण्यासाठी छोटे बंधारे उभारण्यासारख्या कायमस्वरूपी उपायांचा अभ्यास केला जाईल, असे नितेश राणे म्हणाले.