
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी
नाशिक सत्र न्यायालयात TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अँटिसिपेटरी बेल अर्जावर सुनावणी पार पडली. अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांना बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि SIT कडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. गर्भधारणा हा जामीनासाठी एकमेव आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकरणातील गंभीर आरोप आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी 27 एप्रिल 2026 रोजी ठेवली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
