टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; प्रताप सरनाईक

Share this Video

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या Aggregator Policyबाबत माहिती दिली. प्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी चालकांना बॅज घेणे आवश्यक असून, त्यासाठी राज्यात 15 वर्षे वास्तव्याचा दाखला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही चालकांकडे डुप्लिकेट परवाने आढळल्याचे तसेच परदेशातून आलेले सुमारे 30 चालक पकडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.भारत टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडोसह विविध कंपन्यांनी अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांत आवश्यक कागदपत्रे RTOकडे सादर करावी लागतील. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर परवानगी दिली जाईल. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर किंवा रॅपिडो चालवण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य असून अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी काही मुदत दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. प्रवाशांना नेण्यास नकार देणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांविरोधात तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत बोलताना 15 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित तीन मागण्यांसाठी सरकारने वेळ मागितल्याचे सरनाईक म्हणाले. एका समाजाचा हक्क काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची दारे खुली असून जरांगेंनी आपल्या मागण्या मांडाव्यात, मात्र नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्यास आम्हीही मराठा आहोत आणि रस्त्यावर उतरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या ‘टायगर’ वक्तव्यावर सरनाईक यांनी टोला लगावला, तर उमर अब्दुल्ला यांनी ‘वंदे मातरम्’च्या सर्व ओळी म्हटल्याचे स्वागत केले.

Related Video