
नाशिक प्रकरणावर नवनीत राणा आक्रमक; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
नाशिकमधील महिला छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेऊन नोकरीसाठी बाहेर पडतात, मात्र अशा ठिकाणी त्यांच्यावर जबरदस्ती आणि छळ होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. तसेच, अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना कोणतीही सवलत देऊ नये, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणातील तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.