
अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
भाजप नेत्या Navneet Rana यांनी अमरावती आणि नाशिकमधील मुलींच्या शोषणाच्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याच्या घटनांवर त्यांनी संताप व्यक्त करत, पीडित मुलींना पुढे येण्याचे आवाहन केले.या प्रकरणात मोठा रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई आणि कोणतीही सवलत न देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन अशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
