Murlidhar Mohol

Share this Video

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाचही जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघातील स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा दावा केला. शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळ सहकारी संस्थेची निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक वेगवेगळी असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगेंनी कथित ऑडिओ क्लिप समोर आणणे त्यांच्या दृष्टीने योग्य असल्याचे सांगत महायुतीतील गैरसमज चर्चेतून दूर होतील, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर संख्याबळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या वक्तव्यांनाही त्यांनी गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले.

Related Video