मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट: Bikram Singh

Share this Video

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर IMD मुंबईचे प्रमुख Bikram Singh यांनी पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे घाट परिसरात अतिवृष्टी ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.लोणावळा परिसरात सर्वाधिक 670 मिमी पावसाची नोंद झाली असून ताम्हिणी घाट आणि इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडणे, कच्च्या घरांचे नुकसान आणि जुन्या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाचा जोर उद्यापासून कमी होऊ शकतो, मात्र काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस सतर्कता कायम राहणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video