Monsoon Rains महाराष्ट्रात २ दिवसात पाऊस कुठे, हवामान अंदाज

Share this Video

IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख Bikram Singh यांनी मुंबईसाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः सखल भाग, जुन्या इमारती, कच्ची घरे आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय जोरदार वारे, झाडे पडण्याचा धोका आणि समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नाशिक, पालघर, रायगड आणि घाट परिसरांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे असेही सांगण्यात आले.

Related Video