PM Modi 76th Birthday

Share this Video

पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सरकारप्रमुख म्हणून त्यांच्या 25 वर्षांच्या कामाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना इलेक्ट्रिक बाईकसह दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्य देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिव्यांगांचे जीवन सोपे आणि आनंदी व्हावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे मोहोळ म्हणाले. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करणाऱ्या मोदींचा वाढदिवस सेवा उपक्रमातून साजरा करणे हा कार्यकर्त्यांचा संस्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगतीबाबत बोलताना भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्याचे, 25 कोटी लोक गरिबीरेषेच्या वर आल्याचे आणि जवळपास 50 टक्के लोकसंख्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेची लाभार्थी असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. 2047 च्या विकसित भारताच्या संकल्पासाठी काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधींबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांना कोणी गंभीरपणे घेत नसल्याचे म्हणत मोहोळ यांनी काँग्रेसच्या जनाधारावरही टीका केली.

Related Video