
संजय राऊतांचा दावा, फडणवीसांना मोदींची केंद्रात ऑफर?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षण खात्याची जबाबदारी देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केल्याचा दावा केला. तरुणांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागल्याचा उल्लेख करत देशाला सक्षम शिक्षणमंत्री मिळावा, असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील संभाव्य नेतृत्व बदल, अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावेळी लागलेल्या बॅनर्स, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका, नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावरील संवादाची तुलना तसेच सिद्धिविनायक मंदिर देणगी प्रकरणावर राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.