Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'

Share this Video

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात सुरू असलेल्या पोलीस चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. आपली किंवा पतीची चौकशी झाल्यास त्याला सामोरे जाऊ, मात्र तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. FIRमध्ये आरोपी म्हणून आपला उल्लेख नसल्याचा दावा करत मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आपले नाव टाकण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला. व्हायरल ऑडिओ क्लिप AI Generated असल्याचा दावा करत त्याबाबत यापूर्वीच तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपींसोबतच्या फोटो आणि ओळखीवरून आपल्याला आरोपी ठरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. प्रदीप पुर्णेकर यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील वाद, एका महिलेने दिलेल्या कथित धमकीचा उल्लेख आणि क्लस्टरच्या मुद्द्यावरही मीनाक्षी शिंदे यांनी आपली बाजू मांडली. या प्रकरणात आपले नाव गोवण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Video