
मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली असून, सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.