
भुजबळांना मनोज जरांगेंचा थेट इशारा
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले. जात पडताळणी समितीवर दबाव आणला जात असल्याचा दावा फेटाळत, उलट जात पडताळणी समितीकडून गोरगरीबांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. प्रमाणपत्रे रद्द करून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.ओबीसी मतदार महायुतीपासून दूर जातील या मुद्द्यावर जरांगे यांनी, अशा धमक्या दिल्यास मराठा समाजही महायुतीपासून दूर जाईल, असा इशारा दिला. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आणि भुजबळांच्या भूमिकेवर टीका केली.ओबीसींच्या संभाव्य Long Marchवरही जरांगे यांनी भुजबळांना लक्ष्य केले. आपल्या सोयीचा मुद्दा असेल तेव्हाच Long Marchची भाषा केली जाते, असा टोला त्यांनी लगावला. धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचाही उल्लेख करत भुजबळांच्या ओबीसीविषयक भूमिकेवर जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले.