
Manoj Jarange Patil
जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप AI निर्मित असल्याचा नवनाथ बन यांचा दावा फेटाळला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला होता का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची फडणवीस यांना माहिती नसावी, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. क्लिपमधील व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरून काम करत होत्या आणि त्यांच्या पाठीशी कोणती यंत्रणा आहे, याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. क्लिपमध्ये अनेक राजकीय विषयांचा उल्लेख असल्याचे सांगत सत्य समोर आणण्याचे आवाहन केले.