ज्ञानेश कुमारांना हटवा: मनोज जरांगेंची मागणी

Share this Video

मनोज जरांगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील मागण्यांवर बोलताना, जनतेला त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात असल्याचे वाटत असेल तर सरकारने त्यांना हटवून दुसऱ्याची नियुक्ती करावी, असे म्हटले. त्यांना पदावर कायम ठेवण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे सरकार आणि निवडणूक आयुक्तांबाबत संशय वाढत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. राज्य सरकारवर टीका करत जरांगे यांनी मराठा आणि धनगर आरक्षण, शेतकरी प्रश्न तसेच MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांचाही उल्लेख केला. दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असून त्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, सातबारा कोरा करावा, पीक विमा आणि अनुदान द्यावे तसेच गावागावात चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणासाठी लढताना आपल्याला आणि मराठा आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा दावा करत त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. सरकारशी शरणागती पत्करणार नाही आणि मंत्र्यांशी मैत्री करणार नाही, असेही जरांगे म्हणाले. नारायणगडावरील पारंपरिक दसरा मेळाव्याला दुष्काळाचे सावट असले तरी सर्व भागांतील बांधवांनी दर्शनासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Video