संवेदनशील प्रकरणावर मजीद मेमन; भडकावू राजकारण टाळा, कायदेशीर कारवाई करा

Share this Video

संवेदनशील धर्मांतर प्रकरणावर ज्येष्ठ वकील मजीद मेमन यांनी संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. अशा मुद्द्यांवर भडकावू वातावरण तयार होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोणतीही घटना राजकारण किंवा धार्मिक भावना भडकवण्यासाठी वापरणे देश आणि समाजासाठी घातक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.या प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करताना त्यांचे संविधानिक हक्क जपले गेले पाहिजेत, शो कॉज नोटीस देऊन योग्य प्रक्रिया पाळली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विलंब न करता तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video