
Marathi News
Asianet News Marathi कडून दररोज महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरातील चालू घडामोडींवर हेडलाईन्स अवघ्या 3 मिनिटात देण्यात येत आहेत. मराठी न्यूज अवघ्या 3 मिनिटात जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला सहज ऐकता आणि पाहता येणार आहेत. मराठी बातम्या यूट्यूबवर पाहण्यासाठी एशिननेट न्यूज मराठीला नक्की फॉलो करा. मराठी न्यूज व्हिडीओ तुम्हाला या ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत.पंकजा मुंडे यांना खुली ऑफरभाजपामधून बाहेर पडा आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपाच्या पंकजा मुंडे यांना खुली आणि जाहीर ऑफरसंजय राऊत विरुद्ध जयकुमार गोरेकोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, जयकुमार गोरे यांचा टोला, तर जयकुमार गोरे यांनी मला ओळखण्याचा प्रयत्नही करु नये, अन्यथा गोरे अडचणीत येतील, जयकुमार गोरेंवर राऊत यांचा पलटवारपक्ष वैगरे सध्या नाहीराजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दीपके यांची भूमिका, बुधवारी सीजेपीची कोअर कमिटीची बैठक, बैठकीत ठरणार पुढील भूमिकासीजेपीला सर्वोच्च दिलासादिल्लीसह सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, विद्यार्थी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा सीजेपीला मोठा दिलासा. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर गुन्हे दाखल होणार, पॅलेट गन आणि एसआयटीवरील सुनावणी 19 ऑगस्टरोजीजेन झीसाठी नवा चेहरा आणणार2029 च्या निवडणुकीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचा मास्टर प्लान, जेन झींचं नेतृत्व करण्यासाठी निवडणार युवा चेहरा, नवीन 38 कोटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती.जेन झी-अल्फाशी संवाद साधणारसरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी जेन झी आणि अल्फा जनरेशनच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार, 15 ते 29 वयाच्या 2 हजार युवकांचा असेल कार्यक्रमात सहभागमी निर्दोष, पण ते हायकोर्टात जाणारमहिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष, तर माझ्यावर हा कट रचला होता, दिल्ली कोर्टाच्या निकालानंतर बृजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया, मात्र निकालाला हायकोर्टात आव्हान देणार, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांची ठाम भूमिकालाल दिव्याची गाडीलाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडे यांचं जाहीर सभेत वक्तव्य, तसेच राजकारणातून निवृत्त व्हावं असंही वाटत माझलगावातील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.