
Maharashtra Drought
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, असे बँका आणि फायनान्स कंपन्यांना निर्देश दिले. शेतकऱ्यांना 100 टक्के पीक विमा मिळावा, मदत दिवाळीपूर्वी पोहोचावी आणि तांत्रिक कारणांमुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणी, चारा, रोजगार आणि दुष्काळी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले.