
प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली
ठाण्यात मराठी भाषा नियमाबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मराठी भाषा शिकलेल्या १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, मराठी शिकण्यास नकार देणाऱ्या किंवा मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्रात काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे, मात्र मराठी शिकणार नाही, अशी भूमिका चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मराठी न शिकणाऱ्या चालकांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.