
पिंपरी-चिंचवडमध्ये भूस्खलन; प्रशासकीय इमारतीवर मातीचा ढिगारा
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या भूस्खलनातील मातीचा ढिगारा प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे 20 जण उपस्थित होते. त्यापैकी 4 जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
