प्रसाद लाडांचा दावा, संवादामुळे मनोज जरांगेंचे उपोषण मागे

Share this Video

छत्रपती संभाजीनगर येथे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी उपोषण अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात येण्यामागे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील वाढलेला संवाद कारणीभूत ठरल्याचे सांगितले.प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि समितीचे उपाध्यक्ष तथा मंत्री यांच्या माध्यमातून झालेल्या चर्चेमुळे गैरसमज दूर झाले आणि समाजाला न्याय देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले. तसेच मराठा समाजासाठी शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांसंबंधी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली जात असल्याचा दावा केला.

Related Video