
Karjat Torrent project
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३००० मेगावॅटच्या पंप स्टोरेज वीज प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावर टीका केली. हा प्रदूषणमुक्त ऊर्जेचा प्रकल्प असून कंपनीने वनविभागाला तिप्पट जमीन दिली आहे आणि ९० हजार झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोळशाच्या विजेच्या तुलनेत प्रदूषण आणि पाण्याची बचत होणार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकल्पाला १८ महिन्यांच्या सुनावणीनंतर मंजुरी मिळाल्याचे सांगत स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.