
मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका
२१ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन केले आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांसाठी अन्नछत्र लावायचे असल्यास संबंधितांनी स्वतःची माणसं पाठवून जेवणाची व्यवस्था करावी, तसेच बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या द्यायच्या असल्यास त्या थेट द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.यावेळी जरांगे पाटील यांनी काही अभ्यासक आणि समन्वयकांवरही टीका केली. १६ ऑगस्टला अभ्यासकांना बोलावून त्यांच्या सूचना आणि दुरुस्त्या ऐकून घेण्याची संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. २९ ऑगस्टच्या उपोषणासाठी पुढील जेआरमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या याबाबत आपले कर्तव्य पूर्ण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी भाष्य केले.