
कॅनमध्ये डिझेल बंद? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल
मनोज जरांगे यांनी डिझेल टंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कॅनमध्ये डिझेल देण्यास निर्बंध घालणाऱ्या प्रशासनावर सवाल उपस्थित करत, शेतात बंद पडलेले ट्रॅक्टर आणि मशागतीची कामं कशी करायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी त्यांनी “Cockroach Janta Party” वाद, बेरोजगार तरुणांचा रोष, सरकारविरोधातील खदखद आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सरकारवर विश्वास नसून समाजाच्या ताकदीवर विश्वास असल्याचं म्हणत, मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
