मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम

Share this Video

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार प्रमाणपत्रे आणि प्रलंबित व्हॅलिडिटी देण्याची मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी सापडलेल्या आणि त्यानुसार अर्ज केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्रे देण्याची मागणीही त्यांनी मांडली.तसेच हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरसंदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. EWS, SC आणि ST प्रवर्गातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, बलिदान गेलेल्या कुटुंबांना नोकरी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कर्जावरील व्याज परतावा आणि सारथीच्या योजनांबाबतही त्यांनी मुद्दे मांडले.याचदरम्यान मराठा अभ्यासकांसोबत झालेल्या बैठकीत हैदराबाद गॅझेटमधील बदल तसेच सातारा, कोल्हापूर आणि इतर गॅझेटियरसंदर्भातील निर्णयांवर चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Related Video