मनोज जरांगे पाटील: प्रमाणपत्र रद्द करण्याचा कट?

Share this Video

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला प्रमाणपत्र देणे आणि त्यानंतर ते रद्द करणे, असा कट सरकारकडून रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला.काही मराठा नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द झाल्याने राज्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यशवंत दहिहंडे यांच्या नोंदींचा उल्लेख करत त्यांनी उपलब्ध पुरावे, जुन्या नोंदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारे नेते भेटत असल्याचा आरोप करत, आपल्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेतल्या जात असल्याचेही जरांगे म्हणाले. प्रमाणपत्रांचा प्रश्न तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करत त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांना इशारा दिला. पुढील आंदोलनाबाबत मराठा समाजाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video