'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके

Share this Video

CEC ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील दिल्लीतील CJP आंदोलनापूर्वी रेल्वे, मेट्रो आणि रस्ते बंद केल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. आंदोलनाच्या भीतीने जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागांतून सुरक्षा दलं दिल्लीत आणल्याचा दावाही त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी 13 कोटी मतदारांची नावं वगळल्याचा आरोप करत संविधानाच्या कलम 19 अंतर्गत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं दिपके म्हणाले. जंतर-मंतर हे आंदोलनासाठी निश्चित ठिकाण असल्याने परवानगीचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. बंगळुरूमध्ये जिवंत मतदारांना मृत घोषित करून त्यांची नावं वगळल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार ज्ञानेश कुमार यांना का वाचवत आहे, असा प्रश्न उपस्थित करत अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला. आंदोलनासाठी परदेशी पाठिंब्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Video