Bikram Singh यांचा इशारा, मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Share this Video

IMD मुंबईचे वैज्ञानिक आणि प्रमुख Bikram Singh यांनी पालघर, रायगड, सातारा तसेच नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट कायम असल्याची माहिती दिली. या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत काही ठिकाणी 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशाराही त्यांनी दिला. झाडे कोसळणे, कच्च्या घरांचे नुकसान आणि सैल वस्तू उडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. 9 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होऊन हवामानात हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता IMDने व्यक्त केली.

Related Video