सार
भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. यानंतर 23 वर्षात पहिल्यांदाच तेजस विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना राजस्थानमधील जैसलमेर येथे घडली आहे.
IAF aircraft Tejas crash : भारतीय वायुसेनेतील तेजस लढाऊ विमानाचा राजस्थानमधील जैसलमेर येथे अपघात झाला आहे. भारतीय बनावटीचे तेजस विमान असून 23 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याबाबत दुर्घटना घडली आहे. खरंतर, तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. एक इंजिन असणाऱ्या लढाऊ विमानाला अत्यंत सुरक्षित मानले जाते.
तेजस लढाऊ विमानाच्या खास गोष्टी
- तेजस लढाऊ विमान आकाराने लहान आहे. यामध्ये एकच सीट आहे. तेजसच्या दोन सीट असणाऱ्या विमानाच्या माध्यमातून ट्रेनिंग दिली जाते. भारतीय वायुसेनेकडूनही दोन सीट असणाऱ्या लढाऊ विमानाचा वापर केला जातो.
- वर्ष 2001 मध्ये तेजस विमानाने पहिल्यांदा उड्डाण केले होते. या विमानाला इनिशिअल ऑपरेशनल क्लिअरन्स (Initial Operational Clearance) मिळाले होते. यानंतर वायुसेनेकडून तेजस विमानाची निर्मिती करण्यास सुरूवात करण्यात आली.
- तेजस 4.5 जनरेशन मल्टी रोल फाइटर जेट आहे. याचा वापर जमिनीवरुन हल्ला करण्यासह हवाई लढाईतही केला जाऊ शकतो.
- तेजसच्या निर्माणासाठी कम्पोजिट मटेरियलचा अधिक वापर करण्यात आला आहे. यामुळे वजन कमी राहण्यासह रडारच्या नजरेपासून लपवण्यासाठी मदत होते. वर्ष 2016 मध्ये वायुसेनाने स्क्वाड्रन क्रमांक 42 मध्ये पहिल्यांदाच तेजस विमानाचा समावेश केला होता.
- भारतीय वायुसेनेत सध्या 40 तेजस एमके-1 विमानाचा वापर केला जात आहे. खरंतर हे तेजसचे अपग्रेड वर्जन आहे. याशिवाय 36,468 कोटी रुपयांचा खर्च करून 83 तेजस एमके-1 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. तेजसची निर्मिती भारतातील शासकीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) यांच्याकडून केले जाते.
- भारतीय हवाई दलाला त्यांची जुनी मिग-21 विमाने बदलायची आहेत. त्याऐवजी एलसीए तेजस मार्क 1 ए विमान जागा घेणार आहेत. एलसीए प्रोग्राम 80 च्या दशकात सुरू करण्यात आला होता.
- तेजस विमानाचे वजन 5450 किलोग्रॅम आहे. या विमानाच्या माध्यमातून 13500 किलोग्रॅम वजनासह उड्डाण करू शकते. याची रेंज तीन हजार किलोमीटर आहे.
- तेजस अधिकाधिक 2205km/h च्या वेगाने उड्डाण करू शकते. याचे डिझाइन डेल्टा विंग प्रकारचे आहे. याला अॅल्युमिनिअम-लिथिअम मिश्रित धातू, कार्बन-फायबर कंपोजिट आणि टाइटेनिअम मिश्रित धातूने तयार करण्यात आले आहे.
- तेजसमध्ये पाइथन 5, डेरबी, Astra BVRAAM, Vympel R-77 आणि Vympel R-73 सारखी मिसाइल्स सुसज्ज केली जाऊ शकतात.
- तेजसमध्ये Kh-59ME टीवी गाइडेड स्टॅण्ड ऑफ मिसाइल, Kh-59MK लेजर गाइडेड स्टॅण्ड ऑफ मिसाइल, अँटी शिप मिसाइल आणि Kh-35 सह Kh-31 मिसाइल लावले जाऊ शकतात.
आणखी वाचा :
देशभरात CAA लागू, लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय