
Harshvardhan Sapkal l धानोरकर-बर्वेंच्या व्हिडिओवर सपकाळांचं उत्तर
काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि श्यामकुमार बर्वे यांच्या बसमधील व्हायरल व्हिडिओवर धानोरकर यांनी मारहाणीचा दावा फेटाळला. रामलीला मैदानावरील मोर्चासाठी जाताना लग्नावरून सुरू असलेल्या गंमतीचा चुकीचा अर्थ काढल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडून बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अनधिकृत ईमेलवरून आलेल्या तक्रारीवर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा भावंडांमधील वैयक्तिक संवाद असल्याचं सांगत SIR आणि ज्ञानेश कुमार यांच्यावरील प्रश्नांपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.