Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय, हिंदूंना नियमित पूजा करता येणार

| Published : Jan 31 2024, 04:35 PM IST / Updated: Jan 31 2024, 04:42 PM IST

Gyanvapi case

सार

ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. कोर्टाने हिंदूंना व्यास तळघरात नियमित पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेसाठी व्यवस्था करावी लागणार आहे.

Gyanvapi Case Update : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने बुधवारी (31 जानेवारी) मोठा निर्णय सुनावला आहे. यानुसार, आता हिंदूंना नियमित पूजा करता येणार आहे. हिंदूंना व्यास तळघरात पूजा करता येणार आहे. याशिवाय कोर्टाने जिल्हा प्रशासनाला सात दिवसांमध्ये पूजेसंदर्भात व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. व्यास तळघर हे ज्ञानवापी मशीदीच्या आतमध्ये आहे. सध्या व्यास तळघर (Vyas Ka Tehkhana) सील करण्यात आले आहे. यापूर्वी येथे हिंदूंकडून पूजा केली जायची.

वाराणसी कोर्टाने दिली हिंदूंना पूजा करण्यास परवानगी 
हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी कोर्टाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. विष्णु शंकर यांनी म्हटले की, हिंदूंना व्यास तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला सात दिवासांमध्ये व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सर्वांना पूजा करण्याचा अधिकार असणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून व्यास तळघरात जशी पूजेची तयारी केली जाईल तेव्हापासून पूजा सुरू होणार आहे. पूजा कशा पद्धतीने करावी यासंदर्भातील निर्णय काशी विश्वनाथ ट्रस्टकडून घेतला जाईल असेही विष्णु शंकर जैन यांनी म्हटले आहे.

न्यायाधीश के.एम. पांडे यांनी राम मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी 1 फेब्रुवारी 1986 रोजी आदेश दिला होता. कोर्टाने ज्ञानवापीसंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचेही विष्णु शंकर जैन यांनी म्हटले आहे.

विष्णु शंकर जैन यांनी पुढे बोलताना म्हटले की, एका सरकारने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत हिंदूंच्या पूजा-प्रार्थनेवर बंदी घातली होती. आज कोर्टाने ती आपल्या लेखणीने सुधारली आहे.

ज्ञानव्यापी मशीदीच्या आधी होते हिंदू मंदिर
दरम्यान, उत्तर प्रदेशातील गोरखपुरमधील के.एम. पांडे असे पहिले न्यायाधीश आहेत ज्यांच्या आदेशानंतर पूजा करण्यासाठी राम मंदिराचे कुलूप उघडण्यात आले होते. ज्ञानवापी मशीदीच्या सीलबंद भागाचे उत्खनन आणि सर्व्हेक्षण करण्याची मागणी करणारीएक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याच्या काही दिवसानंतर वारासणी कोर्टाकडून हिंदूंच्या पूजेसाठीचा आदेश देण्यात आला आहे. हिंदू पक्षानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून (Archaeological Survey of India) समोर आले आहे की, ज्ञानवापी मशीदीच्या आधी येथे एक मोठे हिंदू मंदिर होते.

आणखी वाचा : 

‘ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात द्या’, ASIच्या अहवालानंतर विहिंपची मागणी

President Droupadi Murmu's Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अधिवेशनातील वाचा महत्त्वाचे मुद्दे

सरकारने SIMIवर 5 वर्षांची बंदी घातली, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आदेश