हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ

Share this Video

कल्याणमधील एपीएमसी येथील परीक्षा केंद्रावर बॉम्बे हायकोर्टाच्या क्लर्क भरती परीक्षेदरम्यान उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड, व्यवस्थापनातील त्रुटी आणि परीक्षेच्या वेळेबाबत विसंगती असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. काही उमेदवारांची परीक्षा उशिरा सुरू झाली, तर काही उमेदवारांना परीक्षा सुरू असतानाच लॉगआउट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.परीक्षा केंद्रावरील आसनव्यवस्थाही विस्कळीत असल्याची तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी उमेदवारांना निश्चित आसने देण्यात आली नव्हती. टायपिंग सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या १० मिनिटांच्या कालावधीबाबतही उमेदवारांनी आक्षेप घेतला. इतर परीक्षा केंद्रांच्या तुलनेत या केंद्रावरील व्यवस्थापन आणि सुविधांचा दर्जा कमी असल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

Related Video