Girish Mahajan

Share this Video

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या तयारीतील प्रलंबित कामांवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांना तातडीने सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. ₹35 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून जून-जुलैपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. 31 तारखेला राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री ध्वजारोहणासाठी येणार असल्याचं सांगितलं. कुंभमेळ्यासाठी 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून ₹35 हजार कोटींहून अधिकची विकासकामं होणार असल्याचा दावा केला. तसेच SIR विरोधी आंदोलकांवर परदेशी निधी मिळत असल्याचा आरोप केला.

Related Video