Girija Raut

Share this Video

गिरीजा राऊत यांनी विवाहानंतर सात वर्षे मानसिक, शारीरिक आणि शाब्दिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप केला. लग्नापूर्वी महत्त्वाची माहिती लपवण्यात आल्याचा तसेच सासरच्या कुटुंबीयांनी त्रास दिल्याचा दावा त्यांनी केला. घरातील मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम मोजण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात संबंधित सर्व आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली. तसेच भविष्यात कोणत्याही मुलीचे आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Related Video