
Nitin Gadkari यांची भावनिक श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी ज्येष्ठ नेते Datta Meghe यांच्या निधनावर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी मेघे यांच्याशी असलेलं पारिवारिक नातं, त्यांचा उदार स्वभाव आणि समाजासाठी केलेलं योगदान याची आठवण करून दिली.गरीब कुटुंबातून सुरुवात करून शिक्षण क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारणारे दत्ता मेघे यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक लोकाभिमुख, संवेदनशील आणि प्रेरणादायी नेता गमावला आहे. त्यांची कार्यकिर्द आणि वारसा सदैव लक्षात राहील.