तुकाराम मुंढे: अनालॉग पनीरवर बंदी

Share this Video

महाराष्ट्रात अनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, वाहतूक, प्रक्रिया, साठवण आणि विक्रीवर 30 जुलै 2026 पासून बंदी घालण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली. तपासलेल्या नमुन्यांपैकी 35.4% नमुने निकृष्ट किंवा असुरक्षित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. 25 मे ते 31 जुलै 2026 या कालावधीत 3,137 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. 764 सुधारणा नोटिसा, 165 परवाने निलंबित, तर दूध व्यवसायाशी संबंधित 487 आस्थापनांच्या तपासणीत 218 नोटिसा आणि 33 परवाने रद्द करण्यात आले. सुमारे 28.66 लाख किलो अन्नपदार्थ जप्त किंवा नष्ट करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ₹55 कोटी आहे.

Related Video