Devendra Fadnavis यांचा इशारा, नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता

Share this Video

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर Devendra Fadnavis यांनी नाशिकसाठी मोठा इशारा दिला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान मोठा लो-प्रेशर बेल्ट तयार होत असून ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये जवळपास 300 मिमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.प्रशासनाने शाळा, ग्रामीण भाग आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पालघरमध्ये पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून रायगड आणि घाट परिसरातही अतिवृष्टीची स्थिती कायम आहे. सावित्री नदीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

Related Video