
देवेंद्र फडणवीस: तरुणांसाठी कठोर कायदा येणार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनाचा आनंद साजरा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगत त्यांनी हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून देशातील तरुणांचा असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दाखवत आवश्यक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी कठोर कायदा आणला जात असून तो देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच "भाजप विरुद्ध भारत" या उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संपूर्ण भारत मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.