Devendra Fadnavis

Share this Video

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी शिक्षक, प्राध्यापक आणि विविध संघटनांशी संवाद साधला. प्राध्यापक भरतीसह शैक्षणिक क्षेत्रातील सरकारच्या कामांचा उल्लेख करत पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीत गटबाजी असल्याचा आरोप करत महायुती एकसंघ असल्याचं सांगितलं. अमरावतीत किरण सरनाईक, पुण्यात डॉ. स्मिता जाधव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार असून विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरेंच्या 'रेजीम चेंज' वक्तव्यावर टीका करत सत्ताबदल रस्त्यावर नव्हे, तर संविधानानुसार निवडणुकीतूनच होईल, असं फडणवीस म्हणाले.

Related Video