
केरळ निवडणुकीवर फडणवीसांचा मोठा दावा; NDA सरकार येणार?
केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान Devendra Fadnavis यांनी NDA च्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. जनतेने बदलाचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी Narendra Modi यांच्या व्हिजनशी केरळला जोडण्याची वेळ आली असल्याचे म्हटले.तसेच, त्यांनी UDF आणि LDF यांच्यावर जोरदार टीका करत दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप केला. सबरीमला निधीच्या गैरवापराबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.