
देवेंद्र फडणवीसांचा विदर्भासाठी मोठा प्लॅन, नागपुरात लॉजिस्टिक पार्क उद्घाटन
नागपुरात अत्याधुनिक Godam Logistics Park चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 100 एकरांहून अधिक क्षेत्रात उभारलेल्या या प्रकल्पामुळे नागपूर देशातील मोठं लॉजिस्टिक हब बनणार असल्याचं फडणवीस म्हणाले. लॉजिस्टिक खर्च कमी होऊन उद्योग, उत्पादन आणि रोजगार क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर, गडचिरोली आणि वडसा पर्यंत होणार असल्याने पूर्व विदर्भाच्या औद्योगिकीकरणाला गती मिळेल असंही त्यांनी सांगितलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
