Devendra Fadnavis यांचा विधानसभेत मोठा खुलासा

Share this Video

२४ मार्च रोजी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी एका गंभीर गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात WhatsApp द्वारे AI जनरेटेड अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नाशिक आणि शिर्डी येथील तक्रारींनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपीकडून रोख रक्कम, लॅपटॉप, शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणात अंधश्रद्धा, फसवणूक, सायबर गुन्हे आणि महिलांना धमकावण्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पीडित महिलांना संरक्षण देत त्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.हा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाचा तपशील आणि सरकारची भूमिका.

Related Video