
Fadnavis Casts Vote For Mlc Election
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या रवीनगर येथील दादाजी धुनीवाले मनपा हिंदी शाळेत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाचही जागांवरील मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ₹500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आश्वासन दिले. अडीच वर्षांनंतर ही क्लिप समोर येण्यामागचा हेतू आणि कोणाला लक्ष्य केले जात आहे, याचाही तपास होणार असल्याचे सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांनी केलेल्या स्पाय पेनद्वारे मतदानाच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले.