देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल

Share this Video

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण वारी, निर्मल वारी आणि पंढरपूरसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. वाढत्या वारकरी संख्येनुसार कॉरिडॉर आराखड्यामुळे भविष्यात ४० ते ५० लाख वारकऱ्यांची व्यवस्था करण्याची क्षमता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगत काही जण आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याची टीका केली. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा उल्लेख करत आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पेपर लीकविरोधात केंद्र सरकारने कडक कायदा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीच्या शिक्षेची तरतूद केल्यामुळे विद्यार्थ्यांना समाधान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Video