
फडणवीसांचा युवांना संदेश: युआ जागर यात्रेला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी BJYM च्या ‘युवा जागर यात्रा’ कार्यक्रमात उपस्थित राहून युवांना प्रेरित केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत त्यांनी युवाशक्ती एकत्र आणण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.राज्यातील 65% तरुण लोकसंख्येला सकारात्मक दिशा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांवर टीका करत, युवांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन केलं. ही यात्रा महाराष्ट्रभर फिरून सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.